भारत विरुद्ध इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या खेळीने सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. पंतने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताची धावसंख्या २९४ धावांवर सात गडी बाद झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ८९ धावांची आघाडी घेतली. एकीकडे भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना पंतने ११८ चेंडूत १०१ धावा करत वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने डाव सावरला. पंतने शतक ठोकताना १३ चौकार आणि दोन षटकार मारले. पंतने वॉशिंग्टनसोबत मिळून सातव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. यासोबतच भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ऋषभ पंतच्या झुंजार खेळीचं ट्विट करत कौतुक केलं आहे. “किती चांगला खेळाडू आहे हा? अविश्वसनीय…दबावातही जबसदस्त खेळी….ही पहिलीच वेळ नाही आणि अखेरचीही नाही. येणाऱ्या वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या खेळात महान खेळाडू असेल. अशाच आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत राहा. म्हणून तू मॅच विनर आणि विशेष राहशील,” असं सौरवने म्हटलं आहे.

फक्त गांगुलीच नाही तर इतर खेळाडूंनीही पंतचं कौतुक केलं आहे. यामध्ये केविन पीटरसनदेखील मागे राहिलेला नाही.

याशिवाय अनेक माजी खेळाडूंनी ट्विट करत पंतच्या खेळीचं कौतुक केलं आहे.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपला पात्र होण्यासाठी भाराला हा सामना जिंकणं किंवा ड्रॉ करणं गरजेचं आहे.