News Flash

ओए मेनन; कोहलीची अंपायरकडे केलेली तक्रार व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

पाहुण्या इंग्लंड संघान यजमान भारताचा तब्बल २२७ धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह इंग्लंडनं मालिकेत १-० नं आघाडी घेतली आहे. या सामन्यातील कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडि. यावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली पंचाकडे इंग्लंडच्या फलंदाजाची तक्रार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसामध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा आहे.

इंग्लंड संघाचा फलंदाज खेळपट्टीच्या वरुन धावाताना या व्हिडीओत दिसत आहे. नियमांप्रमाणे धाव घेतना खेळपट्टीवरुन धावता येत नाही. असं असतानाही इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टीवरुन धावाताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने थेट पंचाकडे त्यांची तक्रार केली. ‘ओए, मेनन, थेट पिचमध्ये धावतोय यार, काय चाललंय ते तर बघा’, असं विराट व्हिडीओत बोलताना दिसतोय.

आणखी वाचा- IND vs ENG : पराभवानंतर विराट कोहलीचा इंग्लंडला इशारा, म्हणाला….

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा- WTC फायनलमध्ये भारत कसा पोहचणार? चेन्नईतील पराभवानं बिघडलं गणित

इंग्लंडचा फलंदाज जोफ्रा आर्चर चेंडू मारल्यानंतर खेळपट्टीवर धावून धाव घेताना दिसत आहे. यावेळी यष्टीरक्षण करणाऱ्या ऋषभ पंतच्या बाजूला असणारा विराट पुढे धावत येऊन पंचाकडे तक्रार करतो. या व्हिडीओत कोहलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 1:15 pm

Web Title: india vs england virat kohli complains on field umpire about visiting batsmen running on middle of the pitch nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IND vs ENG : पराभवानंतर विराट कोहलीचा इंग्लंडला इशारा, म्हणाला….
2 WTC फायनलमध्ये भारत कसा पोहचणार? चेन्नईतील पराभवानं बिघडलं गणित
3 IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूला संधी मिळायला हवीच : गावसकरांचं स्पष्ट मत
Just Now!
X