27 February 2021

News Flash

विराटचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

मागील ३१ डावांत कोहलीला शतक झळकावता आलं नाही

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या दहा वर्षात अनेक विक्रम केले आहेत. विराटने दशकभरात तिन्ही प्रकराच्या क्रिकेटमधील जगातील सर्व खेळाडूंना मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. दशताकील सर्वोत्तम संघामध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटचं कर्णधारपदही विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र, गेल्या १४ महिन्यापासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. वर्षभरापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलेलं नाही. चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ४८ चेंडूचा सामना करताना विराट कोहलीनं ११ धावा काढल्या. गेल्या तीन वर्षात विराट कोहली फक्त दुसऱ्यांदा भरातीय खेळपट्टीवर फिरकीविरोधात बाद झाला आहे.

मागील सात कसोटी डावांत विराट कोहली अपयशी ठरला आहे. सात डावांत विराट कोहलीला १८ च्या सर्वसामान्य सरासरीनं फक्त १२७ धावाच करता आल्या आहेत. २०२० मध्ये विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील २३ सामन्यातील २५ डावांत फलंदाजी करताना ३५. ५४ च्या सरासरीनं ८३५ धावा केल्या आहे. यादरम्यान विराट कोहलीनं सात अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र, विराट कोहलीला २०२० मध्ये एकही शतक झळकावता आलं नाही. २०२० मध्ये १४ वेळा विराट कोहली ३० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : इशांतची ऐतिहासिक कामगिरी, ३०० बळींचा टप्पा केला पार

आघाडीचा फळीत फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीची ही खराब कामगीरी आहे. मागील ३१ डावांत विराट कोहलीला शतक झळकवता आलं नाही. विराट कोहलीच्या कारकिर्दीत असं पहिल्यांदाच झालं आहे. विराट कोहलीनं अखेरचं शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविराधात झळकावलं होतं. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना या खराब फॉर्ममधून जावं लागतं प्रत्येकाच्या क्रिकेट कारकिर्दीत अशी वेळ येतेच. गेल्या वर्षभरापासून विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. विराट कोहलीच्या खराब कामगिरीचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर पडत आहे. पण त्याच्या एकूणच आकडेवारीवर नजर मारल्यास फिनिक्स पक्षाप्रमाणे विराट कोहली पुन्हा एकदा झेप घेईल असं दिसतेय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 11:42 am

Web Title: india vs england virat kohli form a worry for indian team with no hundred for 31 innings nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IND vs ENG: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज; इंग्लंडकडे मोठी आघाडी
2 IND vs ENG: वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’; दमदार फलंदाजी करत केला ‘हा’ पराक्रम
3 Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?
Just Now!
X