News Flash

IND vs ENG: विराट कोहलीच्या दुखापतीसंबंधी मोठी अपडेट

पाचव्या आणि निर्णायक सामन्याआधी भारताला मोठा धक्का?

(Photo: AP)

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत आणि इंग्लंड प्रत्येकी दोन सामने जिंकत बरोबरीत आहे. यामुळे पाचवा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. त्यातच कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. चौथ्या सामन्यात शेवटच्या ओव्हर्समध्ये विराट कोहली जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला होता. भारताने हा सामना आठ धावांनी जिंकला.

१५ वी ओव्हर सुरु असताना क्षेत्ररक्षणादरम्यान दुसरी धाव वाचवण्याच्या नादात विराट कोहली जखमी झाला होता. यानंतर विराटने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. दरम्यान कोहलीने आपली दुखापत जास्त गंभीर नसून २० मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्याआधी आपण खेळण्यासाठी तयार असू असं सांगितलं आहे.

“मी चेंडू पकडण्यासाठी धावलो, उडी मारली आणि थ्रो केला. मी त्यावेळी कदाचित योग्य स्थितीत नव्हतो. त्यानंतर मी मैदानाबाहेर गेलो. तापमान घरसत असल्याने शरीरावरही परिणाम होण्याची शक्यता असते. ती जखम अजून मोठी व्हावी अशी माझी इच्छा नव्हती,” असं विराटने सांगितलं आहे.

“हे जास्त काही गंभीर नाही. उद्या संध्याकाळी खेळायचं असल्याने मी संध्याकाळपर्यंत बरं होणं अपेक्षित आहे. त्यामुळेच मैदानातून बाहेर येण्याचा योग्य निर्णय घेतला, जेणेकरुन मैदानात अजून पाच ते सहा वेळा धावण्याची गरज भासणार नाही. महत्वाचा सामना असल्याने हा निर्णय योग्य होता,” असं विराटने सांगितलं आहे.

इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतक साजरं करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि धडाकेबाज खेळी साकारली. सूर्यकुमार, पंत, श्रेयस अय्यरने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताला ८ बाद १८५ अशी समाधानकारक धावसंख्या उभारती आली. भारताने इंग्लंडला १७७ धावांमध्ये रोखलं आणि आठ धावांनी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 11:01 am

Web Title: india vs england virat kohli injury nothing serious 5th t20i in ahmedabad sgy 87
Next Stories
1 मोठी बातमी..! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
2 Road Safety World Series: इंडिया लेजंड्ससोबत फायनलमध्ये कोण खेळणार?
3 IND vs ENG : रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी सूर्यकुमार यादवने खरी ठरवली!
Just Now!
X