06 July 2020

News Flash

हॉकी चॅम्पियन्स ट्राफीमध्ये भारताची ब्रिटनवर मात

सामन्याच्या पूर्वार्धापासून भारताने ब्रिटनवर आघाडी मिळवली होती.

गोल नोंदवल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू.

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने शनिवारी ब्रिटनवर २-१ ने मात करीत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवण्यात आली. सामन्याच्या पूर्वार्धामध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. जागतिक क्रमवारीत ४ स्थानावर असलेल्या ब्रिटनला हरवून भारताने स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे.
भारताकडून मनदीप सिंगने पहिला गोल नोंदवला. ३५ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये हरमनप्रीत सिंगने दुसरा गोल नोंदवत प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान अधिक कठीण केले. ब्रिटनकडून अश्ले जॅकसन याने एक गोल नोंदवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 10:06 pm

Web Title: india vs great britain hockey champions trophy 2016
Next Stories
1 भारताचा झिम्बाब्वेवर ९ गडी राखून विजय
2 महाराष्ट्राची प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलम्पिकमध्ये सानियासोबत खेळणार
3 धोनीच्या ‘युवा ब्रिगेड’ची सोपी परीक्षा
Just Now!
X