भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ५ टी २० सामने खेळणार आहे. त्यानंतर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी युवा मुंबईकर खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

असा असेल एकदिवसीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उफकर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि केदार जाधव

शतकी खेळीसह पृथ्वी शॉचं दमदार पुनरागमन

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाने पहिल्याच सामन्यात शानदार विजेतेपद मिळवले. दुखापतीमधून सावरत संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉने दमदार शतक ठोकले. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने कर्णधार शुभमन गिलच्या साथीने संघाचा डाव सावरला. मात्र ठराविक अंतराने गिल आणि सूर्यकुमार यादवला माघारी धाडण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं शतक पूर्ण करत भारताची बाजू वरचढ ठेवली. १०० चेंडूत २२ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने पृथ्वी शॉने १५० धावा केल्या.

धवनची दुखापत

न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला आता दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. शिखर धवनच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

एकदिवसीय क्रमवारीत धवनची मोठी झेप

भारताकडून संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने सात स्थानांची झेप घेत १५ वे स्थान पटकावले. त्याने केवळ २ सामन्यात १७० धावा केल्या. पहिल्या सामन्यात शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तो ९६ धावांवर बाद झाला. दोनही सामन्यात त्याला शतकाने हुलकावणी दिली. तर तिसऱ्या सामन्यात धवनला दुखापतीमुळे फलंदाजी करण्यात आली आहे.