03 June 2020

News Flash

IND vs NZ : पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते टीम इंडिया

किवींना धूळ चारण्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी २० आणि एकदिवसीय मालिका संपली. भारताने टी २० मालिका जिंकली तर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या भूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. उद्यापासून या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. या मालिकेसाठी दोनही संघ कसून तयारी करत आहेत. यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वेलिंग्टनच्या स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे.

भारतीय संघाने यजमान संघाला धूळ चारण्यासाठी काही योजना आखल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार संघ व्यवस्थापन टीम इंडियातील खेळाडू निवडतील. त्यामुळे सर्वार्थाने दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने संघाची बांधणी करण्यात येईल. पाहूया कसा असू शकतो भारताचा संघ…

भारताचे अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहेत. त्यामुळे भारताला दोन नवख्या सलामीवीरांसोबत मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यावर संघ व्यवस्थापन विश्वास दाखवू शकते. सुरूवात नवख्या खेळाडूंनी केल्यावर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फारसा फरक दिसणार नाही. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे तिघे आपल्या क्रमांकावर खेळताना दिसतील. तर सहाव्या स्थानावर हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

संघात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत पेक्षा वृद्धिमान साहाला संधी मिळू शकते. तसेच भारतीय संघ मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. फिरकीपटूंमध्ये अश्विन आणि जाडेजा यांच्यात शर्यत आहे. पण संघात एकही डावखुरा फलंदाज नसल्याने कदाचित जाडेजाला संधी देण्यात येऊ शकते.

असा असू शकतो संघ – मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

टी २० मध्ये भारताची तर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडची बाजी

सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला आणि टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:21 pm

Web Title: india vs new zealand team india predicted xi for 1st test new openers left handed batsman spinner vjb 91
Next Stories
1 आपण खडतर परिस्थितीमधून जातोय हे ऋषभने स्विकारायला हवं – अजिंक्य रहाणे
2 पाकच्या स्टार खेळाडूला धक्का.. PCB ने केली निलंबनाची कारवाई
3 रोहित शर्मा पाहतोय ‘या’ गोष्टीची वाट
Just Now!
X