भारतीय संघाचा पहिला परदेश दौरा न्यूझीलंडचा असणार आहे. या दौऱ्याला २४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. २४ ते २ फेब्रुवारी दरम्यान संघ ५ टी २० सामने खेळणार आहे. टी २० मालिका झाल्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ मंगळवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला.

IND vs NZ : धवनच्या जागी संघात युवा मुंबईकर खेळाडू

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंड येथे संघ दाखल झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी सहकाऱ्यांसोबत फोटो पोस्ट केला. विराट कोहलीने विमानातील एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याच्यासोबत शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर असल्याचे दिसते आहे. त्याने हा फोटोला ‘ऑकलंडमध्ये पोहोचलो. टीम इंडिया आता मालिकेसाठी तयार व्हा’ असे कॅप्शन लिहिले आहे.

IND vs NZ : संजू सॅमसनला अखेर संधी; BCCI कडून हिरवा कंदील

 

View this post on Instagram

 

Touchdown Auckland. Let’s go @shardul_thakur @shreyas41

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

IND vs NZ : भारताला दुसरा धक्का; आता वेगवान गोलंदाजही दौऱ्यातून बाहेर

उपकर्णधार रोहित शर्माने देखील ऑकलंडमध्ये दाखल झाल्यानंतरचा फोटो टाकला. त्याच्या फोटोमध्ये ऋषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल हे खेळाडू दिसत आहेत. रोहितनेदेखील आपल्या कॅप्शनमधून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ‘न्यूझीलंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत’, असे कॅप्शन त्याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Ready for New Zealand

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

दरम्यान, भारतीय संघ सर्वप्रथम या दौऱ्यावर टी २० मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेत संजू सॅमसनला एकाच सामन्यात संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी त्याला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याला संघातून वगळण्यात आले होते.