भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. या मालिकेत लोकेश राहुल याने एक नवी भूमिका बजावली.

IND vs NZ : धवनच्या जागी मुंबईकर खेळाडूला संधी; पाहा T20…

भारताचा नियमित यष्टीरक्षक ऋषभ पंत हा पहिल्या सामन्यात फलंदाजीच्या वेळी दुखापतग्रस्त झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्या गोलंदाजीवर ऋषभ बाद झाला. त्यावेळी चेंडू त्याच्या बॅटवर आदळून नंतर त्याच्या हेल्मेटला आदळला, त्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी पहिल्या सामन्यात लोकेश राहुल याने यष्टीरक्षणाचा भार सांभाळला. त्यानंतरही पंत तंदुरुस्त न झाल्याने दुसऱ्या सामन्याआधी बॅक-अप किपर म्हणून संघात केएस भरत याला स्थान देण्यात आले होते. पण लोकेश राहुलने संपूर्ण मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. त्याबाबत रवि शास्त्री यांनी झकास उत्तर दिले. “(पंत नसताना आम्ही राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली, कारण) आम्हाला पर्याय कायम आवडतात”, अशी मिश्किल प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.

IND vs NZ : “विराट वेगवान गोलंदाजी कशी खेळतो ते बघू”

शिखर धवनच्या दुखापतीवर शास्त्री म्हणतात…

“शिखर धवन दुखापतग्रस्त झाला हे खूपच दुर्दैवी आहे. कारण धवन हा अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडू आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवून देण्याचे कौशल्य आहे. अशा एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाली तर संघातील सारेच खेळाडू हळहळतात”, असे शास्त्रींनी सांगितले. न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. शिखर धवनच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.