News Flash

भारताची पराभवाची मालिका सुरूच

लौकिकाला साजेसा खेळ करत बलाढय़ ऑस्ट्रेलियाने जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय महिला संघावर ४-२ असा शानदार विजय मिळवला.

| June 28, 2015 06:47 am

लौकिकाला साजेसा खेळ करत बलाढय़ ऑस्ट्रेलियाने जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय महिला संघावर ४-२ असा शानदार विजय मिळवला.
तिसऱ्याच मिनिटाला जोली केनीने शिताफीने गोल करत ऑस्ट्रेलियाला झटपट आघाडी मिळवून दिली. दोनच मिनिटांत वंदना कटारियाने एकहाती गोल करत भारताला बरोबरी करुन दिली. या गोलचा आनंद साजरा करेपर्यंत जोली केनीने बचावपटू दीपिकाला भेदत आणखी एक गोल केला. मध्यंतरानंतर लगेचच पूनम राणीच्या गोलसह भारताने बरोबरी केली. दोनच मिनिटांत जोलीने गोलची हॅट्ट्कि केली. ४४व्या मिनिटाला पेनल्टीवर जोलीने चौथा गोल केला. ढिसाळ बचाव आणि पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करुन घेण्यात आलेले अपयश भारताच्या पराभवाचे कारण ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 6:47 am

Web Title: india vs pakistan
Next Stories
1 कोण होतास तू? काय झालास तू?
2 ओढ हिरवळीची
3 भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा मार्गावर
Just Now!
X