X

Video : सरफराजचा झेल पकडताना मनिष पांडेची सीमारेषेवर कसरत, एकदा पाहाच

भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा

आशिया चषकात सुरु असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात गोलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना वेसण घातली. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ पुरता कोलमडला. केदार जाधवच्या कामचलाऊ फिरकी गोलंदाजीवर पाकिस्तानचे ३ फलंदाज माघारी परतले. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनिष पांडेकरवी झेलबाद झाला. मनिष पांडेचा हा झेल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन पाकिस्तानचा डाव सावरला. कुलदीप यादवने बाबर आझमचा त्रिफळा उडवून भारताला पुन्हा सामन्यात आणलं. यानंतर केदार जाधवच्या गोलंदाजीवर सरफराज अहमदने मोठा फटका लगावला, सीमारेषेपल्याड जाणारा चेंडू बदली खेळाडू मनिष पांडेने अक्षरशः तारेवरची कसरत पकडला. मनिष पांडेने दाखवलेल्या समयसुचकतेचं सध्या सोशल मीडियावर चांगलचं कौतुक होतं आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : हार्दिक पांड्या जायबंदी, भारताच्या चिंतेत वाढ

First Published on: September 19, 2018 7:55 pm
  • Tags: ind-vs-pak, kedar-jadhav, manish-pandey, आशिया कप - 2018,