भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ दमदार खेळीचे प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा संपूर्ण भारतवासियांना आहे. यात अहोरात्र देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमा रेषेवर तैनात असणाऱ्या जवानांचाही समावेश आहे. भारतीय नागरिकांसह भारतीय सैनिकांमध्येही या सामन्याच्या निकालाची उत्सुकता आहे. जम्मू काश्मीरच्या सीमारेषेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना भारतीय संघ या सामन्यात पाकिस्तानला चारीमुंड्या चित करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच सीमा सुरक्षा दलातील छावणीत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. वाद्य आणि नृत्य सादर करत जवान भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यात नेहमीप्रमाणे भारत पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरेल, असा विश्वासही सैनिकांनी व्यक्त केला. पाकिस्तान कधीही आपल्याला टक्कर देऊ शकत नाही. यावेळीही भारतीय संघ त्यांना नेहमीप्रमाणे धूळ चारेल, असे जवानांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.
#WATCH BSF jawans in Jammu dance and rejoice, chant 'India Jeetega' ahead of the #INDvPAK match #ChampionsTrophy2017 pic.twitter.com/nTU2s8hzsv
— ANI (@ANI_news) June 4, 2017
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर क्रिकेटमध्ये फारसा रस नसणाऱ्या नागरिकांमध्येही उत्सुकता दिसून येते. भारत पाकिस्तान या दोन देशातील तणावामुळे भारतीय जवानांमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान दिसणारा हा उत्साह नवीन नाही. यापूर्वी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान देखील जवानांमध्ये असाच उत्साह दिसला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धभूमीवर भारत ज्याप्रमाणे पाकिस्तानवर वरचढ ठरतो. त्याच प्रमाणे क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघ पाकिस्तानला भारी पडेल, असा विश्वास जवानांनी बोलून दाखवला.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर किती धावांचे लक्ष ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 3:24 pm