चँपियन्स ट्रॉफी २०१७ चा महाअंतिम सामना उद्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये रंगणार आहे. या फायनलचा फिव्हर सगळ्या देशात पसरला आहेच. शिवाय तो जगातही पसरताना दिसतो आहे. कारण भारत पाकिस्तानची फायनल मॅच ही सगळ्या जगाचा आकर्षण बिंदू आहे. १८ तारखेला ओव्हल मैदानात हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. उद्या होणाऱ्या या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पहिल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमानुसार १२४ धावांनी पराभव केला आहे. आता उद्याच्या फायनलमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता १२५ कोटी भारतीयांना लागून राहिली आहे.

सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर मात करत पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडचा पाकिस्तानने केलेला पराभव ही कामगिरी निश्चितच चांगली होती. तर भारताने बर्मिंगहॅममध्ये झालेल्या सामन्यात बांग्लादेशवर ९ गडी राखून विजय मिळवला आणि आपले फायनलचे तिकीट निश्चित केले. २००७ च्या टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पहिल्यांदाच फायनल मॅचमध्ये समोरासमोर येत आहेत. त्यामुळे या सामन्यात काय होणार याकडे अवघ्या क्रिकेट फॅन्सचे डोळे लागले आहेत.

भारत आणि पाकिस्तानचा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला हा सामना कोणत्या दिवशी आहे?
१८ जून म्हणजेच रविवारी हा सामना होणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना कधी सुरू होईल?
भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल

इंग्लंडमध्ये हा सामना किती वाजता सुरू होणार?
सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरू होईल

अमेरिकेत मध्ये हा सामना किती वाजता सुरू होईल?
अमेरिकेत हा सामना सकाळी ६ वाजता सुरू होईल

कॅनडामध्ये हा सामना किती वाजता सुरू होईल?
कॅनडामध्ये हा सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल

ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना किती वाजता सुरू होईल?
ऑस्ट्रेलियात हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल

युएईमध्ये हा सामना किती वाजता सुरू होईल?
युएईमध्ये हा सामना दुपारी दुपारी १.३० वाजता सुरू होईल