ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशालामध्ये होईल, अशी आशा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.
‘‘हा सामना धरमशालामध्ये होईल, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याशी माझी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या सामन्यासाठी ज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याची तयारी दर्शवली आहे. यामधून बरेच काही सकारात्मक निष्पन्न होईल. बीसीसीआयकडून सामन्याला हिरवा कंदील असून आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे,’’ असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर म्हणाले की, ‘‘या घडीला हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि राज्य सरकार हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.’’