* भारत विरूद्ध पाकिस्तान पहिला एकदिवसीय सामना
* भारताचा अर्धासंघ अवघ्या तीस धावांवर बाद
भारत विरूद्ध पाकिस्तान पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व भारताला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान भारताचे पाच फलंदाज त्रिफळाबाद झाले असून, निम्मा संघ ३० धावसंख्या असताना तंबूत परतला. पाकिस्तानकडून जुनैद खानने चार, मोहम्मद इरफानने एक गडी बाद करण्यात यश मिळवले. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओले असल्याने सामन्यास एक तास उशीर झाला. या सामन्यात अजिंक्य रहाणेला वगळून त्याच्या जागी वीरेंद्र सेहवागचा समावेश करण्यात आला होता. परंतु वीरेंद्रची बॅट काही तळपली नाही अवघ्या चार धावांवर वीरेंद्र सेहवागला जुनैद खानने त्रिफळाबाद केले. त्यापाठोपाठ गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग यांनाही संघाची ३० धावसंख्या असताना पाकिस्तान गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बाद केले.