भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मैदानावरील पाण्याचा निचरा करण्यासाठीची यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे सामनाधिकाऱ्यांनाही किमान पाच-पाच षटकांचा तरी सामना होईल, असे वाटत होते. मात्र थोडीशी उघडीप घेतल्यानंतर पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने सगळ्या आशा संपुष्टात आल्या. मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे बुधवारी (१८ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेकडे पाहात आहे. या मालिकेतून गुणी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट त्याच्यापुढे असेल. भारताने वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. परंतु आता खरी लढाई क्विंटन डी कॉक आणि कॅगिसो रबाडाच्या दक्षिण आफ्रिकेशी असेल.

आज दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. परिणामी पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Live Blog

19:57 (IST)15 Sep 2019
पहिला सामना पाण्यात

धर्मशाळा येथे होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला आहे.  

19:31 (IST)15 Sep 2019
धर्मशाळामध्ये कोसळधार

धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून पाऊस ये जा करत आहे. त्यामुळे मैदानावर पाणी साचत आहे.  नाणेफेकीला उशीर झाला असून पाऊस असाच सुर राहिल्यास सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

18:39 (IST)15 Sep 2019
पावसाची विश्रांती, नाणेफेक होणार उशिराने

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्याच सामन्यात पावसाने डोकं वर काढल्याने सामना खोळंबला होता. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली असून मैदानातून पाणी हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे.


18:02 (IST)15 Sep 2019
सामना उशीरा होण्याची शक्यता

धर्मशाळामध्ये पुन्हा एकदा पावासाने हजेरी लावल्यामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयनेही ट्विट करत पाऊस सुरू असल्याची माहिती दिली आहे.

17:50 (IST)15 Sep 2019
थोड्याच वेळात होणार नाणेफेक

थोड्याच वेळात नाणेफक होण्याची शक्यता आहे.  पावसाने विश्रांती घेतली असून सामना नियोजित वेळेत सुरू होण्याची शक्यता आहे.

17:06 (IST)15 Sep 2019
सामन्यापूर्वी गब्बरशी चर्चा करताना रवी शास्त्री
17:02 (IST)15 Sep 2019
आकडे काय सांगतायेत?

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये एकूण १३ ट्वेण्टी-२० सामने झाले असून यापैकी आठ सामने भारताने जिंकले असून पाच सामन्यांतून दक्षिण आफ्रिका संघ विजयी ठरला आहे. गतवर्षी याच मैदानावर झालेल्या ट्वेण्टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता.

16:48 (IST)15 Sep 2019
कसा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ?

क्विंटन डी कॉक (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन (उपकर्णधार), टेंबा बव्हुमा, ज्युनियर डाला, बोर्न फॉटर्य़ून, ब्यूरॅन हेन्ड्रिक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅनरिच नॉर्जे, अँडिले फेहलुकयावो, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, ताबारेझ शाम्सी, जॉर्ज लिंडे.

16:47 (IST)15 Sep 2019
कोणाला मिळणार अंतिम ११ मध्ये संधी?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

16:41 (IST)15 Sep 2019
धर्मशाळामध्ये कोसळधार

क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी ट्विट करत धर्मशाळा येथील वातावरणासंदर्भात माहिती दिली आहे.