पावसाचे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सलग तिसऱ्या दिवसावर वर्चस्व जाणवल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला होता. चौथ्या दिवशी सकाळी पंचांनी उपाहारापर्यंत खेळ होऊ शकणार नाही हे स्पष्ट केले. दिवसभरात पंचांनी तीनदा मैदानाची पाहणी करून अखेर दुपारी अडीच वाजता दिवसभराचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी वरुणराजाने कृपादृष्टी राखली तर सकाळी ९.१५ वाजता खेळ सुरू होऊ शकेल. दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने बिनबाद ८० धावा केल्या आहेत.