20 January 2020

News Flash

IND vs SA : …म्हणून शाहबाज नदीमला मिळालं संघात स्थान; विराटने सांगितलं कारण

"कुलदीपला संधी द्यायची होती, पण..."

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला रांची येथे सुरुवात झाली. या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार होते. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीपच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले. यासाठी निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान दिले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा शाहबाज नदीम २९६ वा खेळाडू ठरला.

नाणेफेकीच्या नंतर बोलताना विराटने शाहबाझ नदीमला संघात स्थान दिल्याचे सांगितले. त्याच वेळी त्याने त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी का दिली ते देखील सांगितले. तो म्हणाला की इशांत शर्माला आम्ही विश्रांती दिली आहे. या खेळपट्टीवर दोन वेगवान गोलंदाज रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसाठी पुरेसे आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी देण्याचा विचार होता, पण कुलदीपच्या खांद्याच्या दुखापतीने तो जायबंदी झाला. अशा परिस्थितीत शाहबाज नदीम हा येथील स्थानिक खेळाडू आहे. म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण विराटने दिले.

शाहबाज नदीमचा जन्म बिहारमध्ये झाला असला तरी २००४ पासून तो झारखंडच्या संघाकडून रणजी करंडक स्पर्धा खेळत आहे. त्यामुळे त्याला रांचीच्या मैदानाचा चांगलाच अंदाज असणार. म्हणूनच नदीम संधी दिल्याचे कोहलीने सांगितले. तशातच नदीमने गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही भरीव कामगिरी केली आहे. ३० वर्षीय शाहबाज नदीमने गेल्या काही हंगामांमध्ये स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळणाऱ्या शाहबाज नदीमने ११० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४२४ बळी घेतले आहेत.

First Published on October 19, 2019 11:28 am

Web Title: india vs south africa 3rd test virat kohli tells reason behind inclusion shahbaz nadeem in test team vjb 91
Next Stories
1 आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, भारताची खराब सुरुवात
2 IND vs SA: आमचंच नाणं खणखणीत… डु प्लेसिस पुन्हा नाणेफेक हरला
3 Ind vs SA : शाहबाज नदीमच्या प्रतीक्षेला फळ, भारतीय कसोटी संघात पदार्पण
Just Now!
X