News Flash

….म्हणून आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनीला भारतीय संघात स्थान नाही

ऋषभ पंतकडेच यष्टीरक्षणाची जबाबदारी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. शुक्रवारपासून दोन्ही संघ अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात येतील. यादरम्यान बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी गुरुवारी रात्री संघाची घोषणा केली. टी-२० मालिकेसाठी निवड समितीने भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली आहे. याचसोबत विश्वचषकानंतर दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेलेल्या धोनीलाही संघात जागा मिळालेली नाहीये.

“धोनी सध्या अमेरिकेमध्ये आहे, आणि त्याने आफ्रिका दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं कळवलं होतं. याच कारणासाठी त्याची संघात निवड झालेली नाही.” India Today वाहिनीशी बोलत असताना एम.एस.के. प्रसाद यांनी धोनीला संघात जागा न मिळण्याबाबत स्पष्टीकरण दिलं. दरम्यान निवड समितीने हार्दिक पांड्याला आफ्रिका दौऱ्यासाठी संघात जागा दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 3:26 pm

Web Title: india vs south africa no ms dhoni in india t20i squad msk prasad reveals why psd 91
टॅग : Bcci,Ms Dhoni
Next Stories
1 ISSF Shooting World Cup : अभिषेक वर्माला सुवर्णपदक, सौरभ चौधरीला कांस्य
2 Ind vs WI : पहिल्या कसोटीतील शतकानंतर भावूक झालो होतो – अजिंक्य रहाणे
3 निर्भेळ यशाच्या वाटचालीत पंतच्या कामगिरीची चिंता
Just Now!
X