20 January 2020

News Flash

IND vs SA : …म्हणून कर्णधार नाही तर ‘हा’ खेळाडू उडवणार टॉस

उद्यापासून रांचीच्या मैदानावर रंगणार भारत-आफ्रिका तिसरी कसोटी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली.

“आता ICC च्या स्पर्धा जिंकण्यावर लक्ष द्या”; गांगुलीचा विराटला सूचक सल्ला

आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून लाज राखण्याचे आव्हान आफ्रिकेच्या संघापुढे आहे. त्यासाठी आफ्रिकेचा संघ कसून सराव करत आहे. त्यातच आफ्रिकेच्या संघ एक अनोखा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आफ्रिकेच्या संघातून नाणेफेकीसाठी आफ्रिकेच्या कर्णधाराऐवजी इतर कोणता तरी खेळाडू येण्याची शक्यता आहे.

हे वाचा – Video : गडी बाद केल्यावर गोलंदाजाचं ‘बाबाजी का ठुल्लू’ सेलिब्रेशन

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हा आशियात खेळल्या गेलेल्या मागच्या ९ कसोटी सामन्यात सलग नाणेफेक हरलेला आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या मागे लागलेले हे शुक्लकाष्ट संपवण्यासाठी कर्णधाराऐवजी संघाचा उपकर्णधार टेम्बा बावुमा हा नाणेफेकीसाठी मैदानावर येणार असल्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार डु प्लेसिसनेच याबाबत सामन्याच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ही बातमी वाचाच – “आता शास्त्रींनी काय केलं?”; गांगुलीची कोपरखळी

दरम्यान, पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला. विराटने २५४ धावांची खेळी केली. पण आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला. भारताकडे त्रिशतकी आघाडी असल्याने आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने सामना एक डाव व १३७ धावांनी जिंकला.

First Published on October 18, 2019 5:41 pm

Web Title: india vs south africa reason behind captain faf du plessis not coming out for toss vice captain temba bavuma virat kohli rohit sharma vjb 91
Next Stories
1 Video : गडी बाद केल्यावर गोलंदाजाचं ‘बाबाजी का ठुल्लू’ सेलिब्रेशन
2 सर्फराझची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी
3 “आता शास्त्रींनी काय केलं?”; गांगुलीची कोपरखळी
Just Now!
X