भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी भारतापुढे ३०४ धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३०३ धावा केल्या आहेत.
डिव्हिलियर्सने ७३ चेंडूंचा सामना करताना ६ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. तर प्लेसिसने ७२ चेंडूत ६२ धावा काढल्या. या दोघांच्या धावांच्या बळावर द. आफि्रका ३०० धावांचा टप्पा पार करू शकला. भारतातर्फे उमेश यादव आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर आर. अश्विनने एक विकेट घेतली. अश्विन दुखापतीमुळे पूर्ण दहा षटके टाकू शकला नाही.