19 September 2020

News Flash

Video : मोहालीच्या मैदानावर विराट कोहलीचा रुद्रावतार

क्षेत्ररक्षणादरम्यान विराटने स्टम्प रागाने उडवला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली. विराट कोहलीने फलंदाजीदरम्यान नाबाद ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला. मात्र याच सामन्यात विराट कोहलीचा रुद्रावतार क्रिकेट प्रेमींना पहायला मिळाला.

पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांवर रोखलं. विराट कोहलीने बुधवारी झालेल्या या सामन्यात कर्णधार क्विंटन डी-कॉकचा सुरेख झेल पकडत आपण मैदानात किती फिट असल्याचं दाखवून दिलं. मात्र इतर भारतीय क्षेत्ररक्षकांनी या सामन्यात थोडीशी निराशा केली. दहाव्या षटकात मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान श्रेयस अय्यर गोंधळामुळे चेंडू वेळेत पकडू शकला नाही, यानंतर श्रेयसने केलेला थ्रो हा चुकीच्या दिशेने होता, त्यातच गोलंदाजीला असलेला हार्दिक पांड्या हा थ्रो पकडण्यासाठी जागेवर नसल्यामुळे आफ्रिकन फलंदाजांनी एकच्या जागी दोन धावा घेतल्या. यामुळे नाराज झालेल्या विराट कोहलीने श्रेयसचा थ्रो पकडत स्टम्प जोराने उडवत आपली नाराजी मैदानावर दाखवून दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान फलंदाजीमध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आल्यावर विराटने आपला सर्व राग आफ्रिकन गोलंदाजांवर काढला. नाबाद ७२ धावा करत विराटने भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 11:46 am

Web Title: india vs south africa virat kohli breaks the stumps in frustration watch video psd 91
Next Stories
1 आफ्रिदीला मागे टाकत विराटची दुसऱ्या स्थानावर मुसंडी, आफ्रिदीनेही केलं कौतुक
2 कोहलीच क्रिकेटचा किंग… या बाबतीत विराटच्या आसपासही कोणी नाही
3 हा काय खेळ झाला का पंत?; पुन्हा अपयशी ठरलेल्या ऋषभला नेटकऱ्यांनी झोडपले
Just Now!
X