विराटसेनेने २०२० या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरूद्धच्या मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला. सुमार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला दोनही सामन्यात मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले. या पराभवाबाबत कर्णधार लसिथ मलिंगा याने भावनिक मत व्यक्त केले.

LBW नाही तर Run Out… विकेट तर घेणारच!; पाहा बुमराहचा भन्नाट Video

“आम्ही २-० ने पराभूत झालो. मी संघातील अनुभवी टी २० क्रिकेटपटू आहे, त्यामुळे मी सर्वोत्तम कामगिरी करणे अपेक्षित होते. पण मला या मालिकेत एकही गडी मिळवता आला नाही. म्हणूनच ६५ ते ७० टक्के वेळा आमची नाचक्की झाली”, असे भावनिक मत त्याने मांडले.

Video : सुपर यॉर्कर! सैनीने उडवला फलंदाजाचा भन्नाट त्रिफळा

मी संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. टी २० क्रिकेट कसं असतं याची मला चांगली कल्पना आहे. माझ्यावरही गडी बाद करण्याचे दडपण असते कारण मी त्यासाठीच संघात आहे. पण जर आम्हाला जिंकायचं असेल तर पहिल्या सहा षटकांत आम्हाला गडी बाद करावे लागतील. या मालिकेत ते आम्हाला जमलं नाही”, अशी प्रमाणिक कबुली त्याने दिली.

IND vs SL : हे आहेत ‘टीम इंडिया’च्या विजयाचे शिल्पकार…

मालिकेतील दोन सामन्यात मलिंगाने अनुक्रमे ४० आणि ४१ धावा दिल्या, पण त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

भारताने जिंकली मालिका

भारताने प्रथम फलंदाजी करत २०१ धावा केल्या आणि श्रीलंकेला २०२ धावांचे आव्हान दिले. दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतके तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २०१ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.