फिरोजशहा कोटलाच्या मैदानात भारतीय फलंदाजानंतर मोहम्मद शमीनं दमदार सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर त्याने श्रीलंकन सलामीवीर  दिमूथ करुणारत्नेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जलदगती गोलंदाज इशांत शर्मानं श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.  त्याने धनंजया डी सिल्व्हा अवघ्या १ धावेवर बाद केलं.  सुरुवातीच्या पडझडीनंतर अँजेलो मॅथ्यूज आणि दिलरुवान परेरानं श्रीलंकेचा डाव सावरला. मात्र, जाडेजाच्या फिरकीत परेरा अडकला. ५४ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्यात  ४२ धावांची भर घालून तो तंबूत परतला. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला त्यावेळी भारताने दिलेल्या ५३६ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेनं ३ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या कसोटीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार चंडिमल यांच्यासमोर कसोटा आहे.  दिवसाखेर  मॅथ्यूज  नाबाद ५७ तर  चंडिमल २५ धावांवर खेळत होते.

रविवारी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मानं भारताच्या दुसऱ्या दिवशीच्या डावाला सुरुवात केली.  या सामन्यात विराट कोहलीनं कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावलं. त्यानं २८७ चेंडूत २५ चौकाराच्या मदतीनं २४३ धावांची खेळी केली. रोहित शर्माने ६५ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.  दोघेही लयीत खेळत असताना फिरकीपटू संदाकान याने रोहितला बाद केले. या सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या विराटलाही लक्षन संदाकान यानेच तंबूचा रस्ता दाखवला. आर. अश्विनला अवघ्या ४ धावावर खेळत असताना लाहिरू गमागे त्याला परेराकरवी झेलबाद केले.  श्रीलंकेकडून पहिल्या डावात संदाकानने ४ बळी टिपले. गमागेनं २ आणि परेराने १ बळी मिळवला.

दुसऱ्या दिवशीच्या खेळात श्रीलंकन खेळाडू दिल्लीतील प्रदुषणाचा सामना करताना दिसले. प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन  खेळाडू तोंडाला मास्क बांधून मैदानात उतरले होते. कर्णधार दिनेश चंडिमलने सामना थांबवण्याची मागणी देखील केली. मात्र, पंचांनी त्याचे अपील फेटाळून लावले. श्रीलंकन संघ वारंवार सामना थांबण्याची विनंती करताना दिसला. धावफलकावर ७ बाद ५३६ धावा असताना विराटने डाव घोषित केला. कोहलीनं डाव घोषित केला, त्यावेळी वृद्धिमान साहा (९) आणि रवींद्र जडेजा (५) धावांवर खेळत होेते.

 

Ind vs SL 3rd Test Delhi Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ४ बाद ३७१ धावा

  • श्रीलंकेची मदार अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार चंडीमलवर
  • अँजेलो मॅथ्यूजचं अर्धशतक, श्रीलंकेचा डाव सावरण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान

 

(पंचांनी दिलरुवान परेराला पायचीत अपीलनंतर नाबाद ठरले, त्यानंतर भारतीय संघाने रिव्हूव घेतला- बीसीसीआय)
  • रिव्ह्यू भारताच्या बाजूनं जाडेजाचा सामन्यातील पहिला बळी
  • श्रीलंकेला तिसरा धक्का, दिलरुवान परेरा ४२ धावावर बाद
  • श्रीलंकेची मदार अँजेलो मॅथ्यूज आणि दिलरुवान परेरावर
  • श्रीलंकेला दुसरा धक्का, इशांत शर्मानं  धनंजया डी सिल्व्हाला दाखवला तंबूचा रस्ता
  • धनंजया डी सिल्व्हाआणि निरोशान डिक्वेला मैदानात
  • श्रीलंकेची खराब सुरुवात, शमीनं पहिल्याच चेंडूवर घेतली दिमूथ करुणारत्नेची  विकेट

  • श्रीलंकेच्या वारंवार सामना थांबवण्याच्या मागणीनंतर विराटने डाव घोषित केला
(छाया सौजन्य बीसीसीआय)
  • प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासानंकप लाहिरू गमागेनं मैदान सोडले
  • कोहलीची विराट खेळी थांबली, लक्षण संदाकनच्या गोलंदाजीवर पायचीत
  • अश्विन चार धावांवर बाद लाहिरू गमागेचा  सामन्यातील पहिला बळी.
  • दिल्लीतील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन खेळाडू तोंडाला मास्क बांधून  मैदानात उतरले आहेत.
  • उपहारानंतर खेळाला पुन्हा सुरुवात अश्विन-कोहली मैदानात
  • द्विशतकानंतर विराट सेलिब्रेशन

  • उपहारापर्यंत भारतीय संघाने गाठला पाचशेचा टप्पा

  • रोहित शर्मानेही साजरे केले अर्धशतक
  • विराट-रोहित जोडी जमली, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • विराट कोहलीची आणखी एक दमदार इनिंग, कसोटी कारकिर्दीत झळकावले सहावे द्विशतक

  • भारतीय संघाने पार केला ४०० धावांचा टप्पा
  • लक्षन संदाकानच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारुन रोहितने दिले आक्रमक खेळण्याचे संकेत