News Flash

Ind vs WI : दुसऱ्या वन-डे सामन्यासाठी भारतीय संघात बदल नाही

भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर

संग्रहीत छायाचित्र

गुवाहटी वन-डे सामन्यात भारताने विंडीजवर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 24 ऑक्टोबररोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर हा सामना रंगेल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विंडीजने दिलेलं 323 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. आपला हाच विजयी फॉर्म कायम राखत भारताने दुसऱ्या सामन्यात संघामध्ये बदल न करण्याचं ठरवलं आहे.

पहिल्या वन-डे सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. हेटमायर व होल्डरच्या फटकेबाजीमुळे विंडीजच्या संघाने 300 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जसप्रित बुमराह आणि भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थिती गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मोहम्मद शमी व उमेश यादवला अधिक चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे.

दुसऱ्या वन-डे सामन्यासाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलिल अहमद (12 वा खेळाडू)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:32 pm

Web Title: india vs west indies 2nd odi india unchanged for vizag odi
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 द. आशियाई शरिरसौष्टव संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे प्रशांत आपटे
2 जागतिक स्पर्धेचं रौप्यपदक बजरंग पुनियाकडून अमृतसर रेल्वे अपघातग्रस्तांना समर्पित
3 मुंबईकर शार्दूल ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार
Just Now!
X