22 February 2019

News Flash

Ind vs WI : विराटसोबतच्या सेल्फीसाठी त्याने भेदलं सुरक्षेचं कडं

राजकोट कसोटीतही घडला होता प्रकार

सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने विराटला थेट मिठीच मारली

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, एका चाहत्याने विराटसोबत सेल्फीघेण्यासाठी मैदानातील सुरक्षेचं कडं भेदून चक्क मैदानात धाव घेतली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात, उपहाराआधीच्या सत्रामध्ये १५ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहली शॉर्ट मिड-ऑन जागेवर क्षेत्ररक्षण करत होता. याचवेळी चाहत्याने मैदानात शिरत विराटसोबत सेल्फी काढली.

First Published on October 12, 2018 2:23 pm

Web Title: india vs west indies 2nd test fan invades pitch once again to click selfies with virat kohli