वेस्ट इंडिजला अवघ्या १८२ धावांत रोखण्यात यश प्राप्त झाल्यानंतर भारताच्या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली होती. सुरु असलेल्या फलंदाजीनुसार जणू एकदिवसीय सामनाच सुरू असल्याचे वातावरण होते. परंतु, शिखर धवन आपल्या वैयक्तीक ३३ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ मुरल विजयही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. परंतु, मुरली विजय बाद झाला तेव्हा स्टेडियमवर एकाच नावाचा जल्लोष सुरू होता सचिन..सचिन..!!
ज्याची आतुरतेने क्रिकेटरसिक वाट पाहत होते. असा क्रिकेटवीर सचिन मैदानात उतरला आणि वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाने टाळ्या वाजवून सचिनला सलाम ठोकला.
एकंदर सचिन स्टेडियम आल्याने वानखेडे सचिनमय झाला होता. सचिनने फलंदाजीला सुरुवात केली आणि पहिल्या सारखीच आजही त्याची बॅट धावांची भुकली असल्या सारखीच दिसत होती. सचिनच्या बॅटने निघणारा प्रत्येक फटका आजही तितकाच कौशल्यपूर्ण दिसत होता. दिवसा अखेर सचिनच्या नाबाद ३८ धावा झाल्या असून चेतेश्वर पुजारा सचिनला उत्तम साथ देत आहे. भारताची धावसंख्या २ बाद १५७ अशा सुस्थितीत आहे.
एकंदर दिवसाचे शेवट गोड झाला आणि उद्या पुन्हा वानखेडेवर सचिनोत्सव पहावयास मिळेल अशी आशा..

* सामन्यात घडले आकड्यांचे रसायन

विशेष म्हणजे सामन्याला एका नवीन आकड्यांची किनार मिळाली आहे.
अश्विनने आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या, कॅरेबियन खेळाडू शिवनारायण चंदरपॉलचा हा १५० कसोटी सामना आहे. तर, सचिनचा २०० वा. त्याचबरोबर क्रिकेटविश्वात २५० झेल घेण्याचा टप्पा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पार केला आहे.
.. अख्ख्या रिकी कुटोला सचिनने बॅगमध्ये भरले होते!
सामन्यात फिरकी गोलंदाजांची जादू पहावयास मिळाली. ओझाने आपल्या फिरकीच्या जोरावर तब्बल पाच विकेट्स पटावल्या. तर, अश्विनच्या खिशात चार विकेट्स पडल्या. यानुसार सामन्यावर फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले.
फोटो गॅलरी: मैदानाबाहेरचा सचिन..
फोटो गॅलरी: ..अन् शेवट गोड व्हावा!
सचिन हा क्रिकेटचा राजदूत -सॅमी