News Flash

अश्विन, ओझाच्या घावाने दुसऱया दिवसाचा शेवट; विंडिजचे तीन फलंदाज तंबूत

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वानखेडेवरील कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स या बातमीत..

| November 15, 2013 09:15 am

दुसऱ्या दिवसात सचिनचे शतक २६ धावांनी हुकले खरे पण, चेतेश्वर पुजारा आणि मुंबईकर रोहित शर्माने शतक ठोकून मास्टर ब्लास्टर सचिनला विजयी गिफ्ट द्यायच्या मनसुब्याने फलंदाजी केली. भारताच्या सर्वबाद ४९५ धावा झाल्या. त्यानुसार वेस्टइंडिजवर ३१३ धावांनी आघाडी प्राप्त केली.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सावध सुरूवात केली. परंतु, भारताच्या अश्विन-ओझा या फिरकी जोडीने विंडिज फलंदाजांना दिवसाचा अखेर होईपर्यंत भेदक मारा करत हैराण केले आणि विंडिजच्या पहिल्या तीन खेळाडूंना माघारी धाडले. दुसऱया दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय गोलंदाजीची अवघी सात षटके झाली. यात अश्विनने दोन तर, ओझाने एक विकेट घेतला. दिवसाअखेर वेस्ट इंडिजची धावसंख्या ३ बाद ४३ अशी आहे.
उद्याच्या दिवसाची सुरूवात भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीने होईल अशी आशा मनात बाळगून वानखेडे वरील क्रिकेट रसिक परतीच्या मार्गाने निघाले.
क्रिकेटपटूपेक्षाही सचिन चांगला माणूस – राहुल गांधी
सचिन ७४ धावांवर बाद झाल्यानंतर सावध खेळी करणाऱया चेतेश्वर पुजाराने मैदानावर उभे राहून आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण होताच पुजाराने भारताच्या ‘ड्रेसिंग रूम’कडे सचिनच्या पोस्टरकडे बॅट दाखवून आपले शतक सचिनला समर्पित केले. आपल्या वैयक्तीक ११३ धावांवर असताना पुजारा बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी मैदानात फलंदाजीला आला खरा पण, अवघ्या ४ धावांवर बाद होऊन धोनीने प्रेक्षकांना नाराज केले. आता स्टेडियमवर ‘रोहितनामा’ सुरू आहे. आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सलग दुसऱया सामन्यात रोहितने शानदार शतक ठोकले आहे. अश्विननेही तडफदार फलंदाजी करत सामन्यात ३० धावा ठोकल्या.
सचिन हा क्रिकेटचा राजदूत -सॅमी
सचिन नंतर विराटने पहिल्याच चेंडुत चौकार लगावून पुन्हा स्टेडियमवरील वातावरण जल्लोषमय केले होते. कसोटी असूनही एकदिवसीय सामना असल्याच्या मानसिकतेने विराट कोहली खेळत होता. अवघ्या ७८ चेंडुत ५७ धावाकरून विराट कोहलीही तंबूत परतला.
धावफलक
पहिले सत्र- वेस्ट इंडिज सर्वबाद १८२; भारत सर्वबाद ४९५ ( चेतेश्वर पुजारा- ११३, रोहित शर्मा- १११*, सचिन तेंडुलकर ७४)
दुसरे सत्र- वेस्ट इंडिज ३ बाद ४३

सचिनसाठी आमिरची खास भेट
सचिनची निवृत्तीची वेळही अचूक -गिलख्रिस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 9:15 am

Web Title: india vs west indies 2nd test live score 2nd day
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 लगे रहो सचिन!
2 सचिनोत्सव!
3 ओझाची कामगिरी सचिनला समर्पित
Just Now!
X