News Flash

विंडीज दौऱ्यात भारताच्या ‘हिटमॅन’ला विश्रांती मिळण्याची शक्यता !

शिखर धवनच्या खराब फॉर्मबद्दलही चर्चा होणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी २१ नोव्हेंबरला एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. प्रसाद आणि पूर्व विभागाचे प्रतिनिधी गगन खोडा यांनी आपला ४ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे गुरुवारची बैठक त्यांची अखेरची बैठक ठरु शकते. या बैठकीत वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मावर अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल चर्चा होऊ शकते.

विंडीजच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेआधी रोहितला पुरेसा आराम मिळावा यासाठी त्याला विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती मिळू शकते. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

याव्यतिरीक्त भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही शिखरला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत निवड समिती कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:55 pm

Web Title: india vs west indies rohits workload to be discussed out of form dhawan may be on trial psd 91
Next Stories
1 Milkha Singh Birthday special : इच्छा नसतानाही ‘कोणाच्या’ आग्रहामुळे जावे लागले पाकिस्तानात
2 निवृत्तीच्या निर्णयावरून मलिंगाचा ‘यु-टर्न’, म्हणाला…
3 Video : ‘टीम इंडिया’ कोलकातामध्ये दाखल, पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत
Just Now!
X