News Flash

भारताचा हॉकीमध्ये मालिका विजय

चुरशीने झालेल्या लढतीत पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या हॉकी कसोटीत १-१ अशी बरोबरी स्वीकारली आणि मालिकेत २-१ असा विजय मिळविला.

चुरशीने झालेल्या लढतीत पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. ४१ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या निक रॉसने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. त्याने सुरेख चाल करीत संघाचे खाते उघडले. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. आणखी दोनच मिनिटांनी भारताच्या एस.व्ही. सुनीलने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात भारताने किमान दोन वेळा गोल करण्याची संधी दवडली. ११ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र रुपींदरपाल सिंगला त्याचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर न्यूझीलंडच्या ब्लेअर टॉरंट यानेही गोल करण्याची हुकमी संधी वाया घालविली. पूर्वार्धात भारताच्या आकाशदीप सिंगनेही गोल करण्याची संधी दवडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 6:21 am

Web Title: india win hockey match
Next Stories
1 पेले आले हो..! कोलकातामध्ये माजी महान फुटबॉलपटूचे जल्लोषात स्वागत
2 विशेष खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक मिळेल -सोनवाल
3 दिल्लीचा विदर्भवर विजय