News Flash

भारताला महिलांचे सांघिक विजेतेपद

दीपक शिंदे आणि हिमानी परब सर्वोत्तम मल्लखांबपटू

सिंगापूर द्वितीय आणि मलेशियाला तृतीय स्थान; दीपक शिंदे आणि हिमानी परब सर्वोत्तम मल्लखांबपटू

पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत महिला गटाचे सांघिक विजेतेपद अपेक्षेप्रमाणे भारताने पटकावले. द्वितीय स्थानी सिंगापूरला आणि तृतीय स्थानी मलेशियाला समाधान मानावे लागले. भारताच्या दीपक शिंदे आणि हिमानी परब यांना सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून गौरवण्यात आले.

शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या या स्पर्धेत रविवारी भारताच्या महिला मल्लखांबपटूंनी त्यांच्या कौशल्याचे दर्शन घडवताना २४४.७३ गुणांसह सांघिक जेतेपदावर नाव कोरले. पुरुषांमध्ये पुरेसे संघच नसल्याचे कारण देत सांघिक विजेतेपद रद्द करण्यात आले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते.  महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये चुरस रंगली.

सांघिक निकाल (मुली)

१. भारत (२४४.७३ गुण), २. सिंगापूर (४४.४५ गुण), ३. मलेशिया (३०.२२ गुण)

वैयक्तिक विजेतेपद (मुली)

१. हिमानी परब (७४.७०, भारत), २. प्रतीक्षा मोरे (७४.४०, भारत) ३ . किको ताकेमोतो (५३.१०, जपान)

वैयक्तिक विजेतेपद (मुले)

१. दीपक शिंदे (८४.३०, भारत), २. सागर ओव्हळकर, (८३.७०, भारत), ३. सेबॅस्टियन क्रिमर (३७.२५, जर्मनी)

दोरीचा मल्लखांब मुले (मोठा सेट)

१. सागर ओव्हळकर (भारत), २.  दीपक शिंदे (भारत), ३. सेबॅस्टियन क्रिमर (जर्मनी);

पोल मल्लखांब मुले (मोठा सेट)

१. सागर ओव्हळकर (भारत), २. दीपक शिंदे (भारत), ३. मयूर दलाल (जर्मनी)

पोल मल्लखांब मुले (लहान सेट)

१. सागर ओव्हळकर (भारत) २.  दीपक शिंदे (भारत), ३. मयूर दलाल (जर्मनी)

दोरीचा मल्लखांब मुले (लहान सेट)

१. दीपक शिंदे (भारत), २. सागर ओव्हळकर (भारत), ३. सेबॅस्टियन क्रिमर (जर्मनी)

पोल मल्लखांब मुली (लहान सेट)

१. किको ताकेमोतो (जपान) २. डेलिया सेरुटी (इटली), ३. हिमानी परब (भारत)

दोरीचा मल्लखांब मुली (लहान सेट)

१. हिमानी परब (भारत), २. प्रतीक्षा मोरे (भारत) ३ . डेलिया सेरुटी (इटली)

पोल मल्लखांब मुली (मोठा सेट)

१. किको ताकेमोतो (जपान) २.  डेलिया सेरुटी (इटली), ३. हिमानी परब (भारत)

दोरीचा मल्लखांब मुली (मोठा सेट)

१. हिमानी परब (भारत), २. प्रतीक्षा मोरे (भारत) ३ . डेलिया सेरुटी (इटली)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:14 am

Web Title: india win mallakhamb world championship 2019
Next Stories
1 पोल मल्लखांबमध्ये पराभूत भारतासाठी धोक्याची घंटा!
2 शाळा-महाविद्यालयांत वर्षांतून एकदाच क्रीडादिवस का?
3 ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीनेच सराव सुरू!
Just Now!
X