विजयाची केवळ औपचारिकता पूर्ण करणे बाकी असलेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर सहज मात केली. दुसऱया डावानंतर अवघ्या ५० धावांचे ऑस्ट्रेलियाच्या संघाने ठेवलेले लक्ष्य भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पहिल्या कसोटी विजयानंतर भारताने मालिकेत १-०ने आघाडी घेतली. 
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव मंगळवारी सकाळी अवघ्या २४१ धावांत आटोपला. मैदानावर खेळण्यासाठी असलेल्या शेवटच्या जोडीपैकी नॅथन लिऑन ११ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने त्याला बाद केले. त्यानंतर मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवाग मैदानावर आले. मुरली विजय ६ धावांवर पॅटिनसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सेहवागही १९ धावांवर नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकरने विजयाची कामगिरी पूर्ण केली.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – ३८०
भारत पहिला डाव – ५७२
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – २४१
भारत दुसरा डाव – ५०