महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका 

भारतीय महिलांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळेच त्यांना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने फिरकी गोलंदाजीच्या बळावर हा सामना आठ विकेट राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

इंग्लंडच्या डॅनिली हॅझेल (४/३२) व सोफी एसेलस्टोन (४/१४) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताचा डाव ३७.२ षटकांत ११३ धावांमध्ये कोसळला. भारताकडून स्मृती मानधना (४२) व दीप्ति शर्मा (२६) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला टिच्चून फलंदाजी करता आली नाही.

डॅनिली वॉट (४७) व टॅमी ब्युमाँट (३९) यांनी ७३ धावांची सलामी नोंदवत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. वॉटने पाच चौकारांबरोबरच दोन षटकारही ठोकले. सलामीची जोडी परतल्यानंतर हीदर नाईटने नाबाद २६ धावा करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोन संघांमधील तिसरा सामना गुरुवारी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत : ३७.२ षटकांत सर्वबाद ११३ (स्मृती मानधना ४२, दीप्ती शर्मा २६; डॅनिली हॅझेल ४/३२,सोफी इक्लेस्टन ४/१४) पराभूत वि. इंग्लंड : २९ षटकांत २ बाद ११७ (डॅन व्ॉट ४७, तम्सिन ब्यूमाँट नाबाद ३९, हेदर नाईट नाबाद २६; एकता बिस्त २/४४)