08 March 2021

News Flash

कौतुकास्पद! भारतीय महिलांचे दमदार कमबॅक; स्पेनला बरोबरीत रोखले

स्पेनविरुद्धची दुसरी लढत १-१ अशी बरोबरीत

भारतीय महिलांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत हॉकी मालिकेतील स्पेनविरुद्धची दुसरी लढत १-१ अशी बरोबरीत रोखली. गुरजित कौर हिने ४३व्या मिनिटाला भारताला आघाडीवर आणल्यानंतर मारिया टोस्ट हिने ४९व्या मिनिटाला गोल करून स्पेनला बरोबरी साधून दिली.

मध्यंतरापर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही. तिसऱ्या सत्रात भारताने गुरजित कौरच्या गोलमुळे सामन्यात आघाडी घेतली. पण भारताचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. भारतीय खेळाडूंच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवत स्पेनकडून टोस्ट हिने गोल केला आणि सामना १-१ अशा बरोबरीत आणला. आता तिसरी लढत आज होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 5:30 pm

Web Title: india womens hockey team makes comeback after 1st loss to spain
Next Stories
1 IND vs NZ : कॅप्टन कोहलीचा रिकी पॉन्टिंगला धोबीपछाड
2 यशस्वी दौऱ्यानंतर विरुष्का Vacation Mode वर
3 IND v NZ : मराठमोळी स्मृती जगात भारी ! मानाच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान
Just Now!
X