प्रसिद्ध हॉकीपटू  ध्यानचंद यांची जयंती आणि खेळ दिनाच्या दिवशी भारतीय महिला ह़ॉकी संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय महिला हॉकी संघ हा २०१६ साली होणा-या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारताचा हा पहिलाच महिला हॉकी संघ आहे. यापूर्वी १९८० साली महिला संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. मात्र, तो संघ तेव्हा स्पर्धेत सहभागी झाला नाही.
भारतीय महिला ह़ॉकी संघाने ‘हॉकी वर्ल्ड लीग’च्या उपांत्य फेरीत जपानचा १-० पराभव करत पाचवे स्थान पटकाविले होते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी हा संघ पात्र ठरण्याच्या आशा बळावल्या होत्या. मात्र, त्याची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ खेळताना दिसणार आहेत.