भारताच्या पुढील महिन्यात होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरलेले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि प्रक्षेपण वाहिनी टेन स्पोर्ट्स यांच्यातील वाटाघाटी योग्य कालावधीत यशस्वी झाल्या नाही तर हा दौरा पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
भारताचा झिम्बाब्वे दौरा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही बीसीसीआय आणि टेन स्पोर्ट्स यांच्या संपर्कात असून, तोडगा निघेल अशी आशा झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने प्रकट केली आहे. १० जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.