टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. सोमवारी भारतीय खेळाडूंनी १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ७ वर पोहोचली आहे. टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला होता. रविवारी मिळालेल्या पदकांमध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश होता.

सोमवारी भारतीय नेमबाज अवनी लेखराने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. या पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. तर भारताच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. सोमवारी योगेश कथुनियाने ४४.३८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले. तर ब्राझीलच्या बेटिस्टा डॉस सँतोस क्लॉडीनने ४५.५९ मीटर थ्रो टाकत सुवर्णपदक मिळवले.

दोन वेळचे सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझारिया यांनी यावेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर कब्जा केला आहे. त्याचबरोबर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदके जिंकली आहेत.

अवनी लेखराने जिंकले सुवर्ण

भारताच्या अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.

वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू झालेल्या योगेशने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ४४.३८ मीटर थाळी फेकत टाकून दुसरे स्थान पटकावरे. वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेता योगेशचा पॅरालिम्पिकमध्ये पहिला, तिसरा आणि चौथा प्रयत्न अयशस्वी झाला, तर दुसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ४२.८४ आणि ४३.५५ मीटर थ्रो केला.

देवेंद्र झाझरिया आणि सुंदरसिंह गुर्जर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक (एफ४६ श्रेणी) मध्ये चांगली कामगिरी करून भारताच्या खात्यात आणखी दोन पदके टाकली आहेत. देवेंद्र झाझरियाने रौप्य तर सुंदर सिंहने कांस्य जिंकले आहे. यासह भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकली आहेत.

सुवर्णपदक श्रीलंकेच्या मुडियासेलेज हेराथने पटकावले आहे. त्याने ६७.७९ मीटरवर भाला फेकला फेकले. त्याचबरोबर देवेंद्रने ६४.३५ तर सुंदर सिंगने भाला ६४.०१ मीटर दूर भाला फेकला. त्याचबरोबर देवेंद्रने ६४.३५ मीटर भाला फेकत रौप्य पदक मिळवले आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताकडून दोनदा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.