10 August 2020

News Flash

प्रेक्षकांच्या शेरेबाजीवर ज्वाला गट्टा नाराज

भारतीय बॅडमिंटन लीगचे आकर्षण असलेली ज्वाला गट्टा हिने प्रेक्षकांच्या अश्लील शेरेबाजीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून स्पर्धेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडे तिने ही नाराजी प्रकट केली.

| August 27, 2013 02:36 am

भारतीय बॅडमिंटन लीगचे आकर्षण असलेली ज्वाला गट्टा हिने प्रेक्षकांच्या अश्लील शेरेबाजीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून स्पर्धेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडे तिने ही नाराजी प्रकट केली. कांतिराव इनडोअर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ज्वाला सहभागी झाली होती. दिल्ली स्मॅशर्सकडून खेळताना तिने व्ही.दिजू याच्या साथीत मिश्र दुहेरीत संघास विजय मिळवून दिला. दिल्लीने बांगा बिट्सवर ४-१ अशी मात केली. हा सामना सुरू असताना काही प्रेक्षकांनी तिला उद्देशून वैयक्तिक व अश्लील शेरेबाजी केल्यामुळे ती खूप नाराज झाली व तिने सामन्याच्या संयोजकांकडे आपले गाऱ्हाणे मांडले असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2013 2:36 am

Web Title: indian badminton league jwala gutta upset with lewd comments from fans
Next Stories
1 दिल्लीचा बांगा बिट्सवर विजय
2 निवड चाचणीत विजेंदरचा सहभाग होणार
3 विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर्स सज्ज
Just Now!
X