News Flash

बुद्धिबळ : भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्सना पराभवाचे धक्के

आंतरराष्ट्रीय मास्टर्स कार्तिकेयन मुरली आणि राजेश व्ही. ए. व्ही या भारताच्या बुद्धिबळपटूंना सहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या

| June 2, 2013 03:42 am

आंतरराष्ट्रीय मास्टर्स कार्तिकेयन मुरली आणि राजेश व्ही. ए. व्ही या भारताच्या बुद्धिबळपटूंना सहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या फेरीअखेर चार बुद्धिबळपटू साडेचार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अर्मेनियाचा ग्रँडमास्टर बाबूजियान लेव्हॉन आणि जॉर्जियाचा ग्रँडमास्टर पान्तसुलैया लिवान यांनी नवव्या चालीतच बरोबरी पत्करली. त्यांच्यासह जॉर्जियाचा अव्वल मानांकित ग्रँडमास्टर मिखाइल माहेदिश्विली आणि अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोसियान डेव्हिट हे चार जण आघाडीवर आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा आणि विक्रमादित्य कुलकर्णी यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले. २१०० रेटिंग गुणांखाली झालेल्या गटात सुप्रिया जोशी, स्नेहल भोसले, चिराग सत्कार, तेजस जोशी, शंतनू भांबुरे आणि विराज ताम्हणकर या मुंबईच्या खेळाडूंसह अन्य सात जण ४ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 3:42 am

Web Title: indian beat international chess player in mumbai mayor chess competition
टॅग : Chess
Next Stories
1 आयपीएल स्पॉट फिक्सिंग: विंदूने केला होता अॅडम गिलख्रिस्ट, मनप्रित गोनीशी मैत्रीचा प्रयत्न
2 खेळ म्हणून तिरंदाजीची ओळखच नाही -दीपिका
3 नदाल, फेडरर, सेरेना शारापोव्हा सुसाट!
Just Now!
X