जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या अग्रमानांकित अमित पांघलने ५२ किलो वजनी गटात विजय प्राप्त करत आपले पहिलेवहिले ऑलिम्पिक तिकीट मिळवले. फिलिपाईन्सच्या कार्लो पालम याला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत अमिल पांघलने धूळ चारली. भारताचा अग्रमानांकित बॉक्सर अमित पांघल याने पालमला १-४ असे दणदणीत फरकाने पराभूत केले. अमित पांघलने या आधीदेखील पालमला २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आणि २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पराभूत केले होते.

दरम्यान, काल भारताचा अव्वल मुष्टियोध्दा विकास कृष्णन याने ६९ किलो वजनी गटात आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुध्द स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. यासह त्याने टोकियो ऑलिम्पिकचा कोटादेखील मिळवला. विकास कृष्णन याने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा मुष्टियोध्दा सेवोन ओकाजवा याचा ५-० ने पराभव करत विजय मिळविला. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत आगेकूच केली असून तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचा कोटा मिळवला.