मेरी कोम, शिवा थापा यांचा समावेश

क्विनान, चीनमध्ये होणार असलेल्या आशियाई बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. पाच वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरणाऱ्या एम. सी. मेरी कोमसह शिवा थापाचा या संघात समावेश करण्यात आला आहे. जागतिक बॉक्सिंग महासंघातर्फे नेमलेल्या अस्थायी समितीने भारतीय संघ जाहीर केला. प्रत्येक वजनी गटातील अव्वल तीन बॉक्सिंगपटूंची रिओ ऑलिम्पिकवारी पक्की होऊ शकते. या महिनाअखेपर्यंत राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना न झाल्यास भारतीय ऑलिम्पिकपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरूनही त्यांची रिओवारी धोक्यात येऊ शकते. जागतिक संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघावर बरखास्तीची कारवाई केली होती.

संघ

पुरुष : एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), गौरव बिधुरी (५२), शिवा थापा (५६), धीरज (६०), मनोज कुमार (६४), मनदीप जांगरा (६९), विकास कृष्णन (७५), सुमित संगवान (८१), परवीन कुमार (९१), सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक).महिला : एम. सी. मेरी कोम (५१), एल. सरिता देवी (६०), पूजा राणी (७५)