13 July 2020

News Flash

ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची मुभा – विराट कोहली

विराटची इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत

२०१९ विश्वचषक स्पर्धेत आपलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. ३ ऑगस्टपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधलं वातावरण तणावाचं झालं होतं. निर्णय प्रक्रियेत विराट-रोहित यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र भारतीय संघात, प्रत्येक खेळाडूला ड्रेसिंग रुममध्ये आपलं मत मांडण्याची मुभा असते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – आपलं कोण, परकं कोण?? एक पराभव तुम्हाला खूप शिकवतो – विराट कोहली

विराट कोहलीने यावेळी भारतीय संघातील नवोदीत खेळाडूंचं कौतुक केलं. “ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यासारखे खेळाडू खूप प्रतिभावान आहेत. १९-२० व्या वर्षात हे खेळाडू ज्या पद्धतीने खेळतात, तसं आम्हालाही जमलं नव्हतं. आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे या खेळाडूंना चांगला अनुभव आणि आत्मविश्वास मिळतो. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आपल्या देशाचं नेतृत्व करत आहोत ही भावना मनात कायम राहिली पाहिजे.”

यदा-कदाचित या खेळाडूंच्या हातून चुक झाली तरीही त्यांना मी मित्राच्या भावनेतून समजावतो. ड्रेसिंग रुममध्ये आता कोणालाही ओरडलं जात नाही. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंह धोनी मी प्रत्येक खेळाडूशी मित्र म्हणूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी केलेली चूक तुम्ही करु नका, तुमची कारकिर्द घडवण्याचा हाच काळ आहे. तू सध्या चुकीच्या रस्त्यावर आहेस, अशा शब्दांत युवा खेळाडूंशी बोललो की त्यांनाही बरं वाटतं. कठीण काळात मी प्रत्येकाला चुक सुधारण्याचा वेळ देतो. विराट ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 4:36 pm

Web Title: indian captain virat kohli open up about dressing room atmosphere psd 91
टॅग Virat Kohli
Next Stories
1 IND vs WI : टीम इंडियामध्ये ‘हा’ खेळाडू हवा का?; ICC ने विचारला सवाल
2 गोड-तेलकट पदार्थ खाणं टाळा, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा डाएट प्लान
3 जॉन्टी ऱ्होड्स टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत?
Just Now!
X