News Flash

VIDEO: टीव्हीवर सामना पाहणाऱ्या भारतीयांनी असा साजरा केला भारताचा विजय

मॉलपासून हॉस्टेलच्या हॉलपर्यंत एकच कल्ला...

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना

क्रिकेटच्या भाषेत ‘नेल बायटिंग फिनीश’ म्हणतात त्याप्रमाणे निदहास चषक टी-२० स्पर्धेच्या शेवटचा सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या चेंडूवर कार्तिकने लागवलेल्या षटकाराने झाला. कार्तिकने टोलवलेला चेंडू सिमेपल्याड पडताच भारतीय क्रिकेट संघाच्या डग आऊटमध्ये तसेच मैदानातील प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये एकच जल्लोष झाला. कोलंबोमधील हा सामना लाखो भारतीयांनी टिव्हीवरच पाहिला. काहींनी मॉलमध्ये तर काहींनी हॉस्टेलमधील हॉलमध्ये या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याचा आनंद लुटला. त्यातही भारताने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हेराऊन घेत चेरी ऑन द टॉप प्रकारे या मालिकेचा शेवट केला. कार्तिकने शेवटचा चेंडू कव्हरवरून प्लॅट सिक्स शॉर्ट म्हणतात तसा मारत भारताचा विजय साकारल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय चाहत्यांनी केलेल्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पाहा याच व्हायरल झालेल्या व्हिडीओंपैकी काही खास व्हिडीओ…

Next Stories
1 अनेक दिवसांपासून असे फटके मारण्याचा सराव करत होतो – दिनेश कार्तिक
2 BLOG : कार्तिक विनिंग कार्तिक
3 …म्हणून अंतिम सामन्याच्या वेळी दिनेश कार्तिक होता नाराज
Just Now!
X