News Flash

पांड्याने वडिलांना दिले खास ‘सरप्राईज गिफ्ट’

यशात वडिलांचा मोलाचा वाटा

मैदानातील अफलातून खेळीने पांड्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या आणि कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटीत पहिले शतक झळकावणाऱ्या हार्दिक पांड्याच्या आयुष्यात वडिलांचे स्थान मोठे आहे. मैदानातील अफलातून खेळीने पांड्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात वडिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. खुद्द पांड्याने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली. यशाच्या शिखरावर असणाऱ्या पांड्याने यशासाठी आत्मविश्वास देणाऱ्या वडिलांचे खास आभार मानले. एवढेच नाही तर वडिलांना त्याने सरप्राईज गिफ्ट देखील दिले.

एक कार भेट देऊन त्यांने वडिलांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केलाय. २३ वर्षीय पांड्याने सलग चार ट्विट करुन वडिलांविषयी असणारा आदर आणि त्यांच्याप्रती असणारे प्रेम दाखवून दिले. क्रिकेट मैदानातील यशात माझ्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे, असे ट्विट त्याने केले. पांड्याने ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पांड्याचे वडील आणि त्याचा भाऊ दिसतो आहे. या ट्विटमध्ये पांड्याने लिहिलंय की, ‘ज्या कारच्या शेजारी तुम्ही उभे आहात त्या कारचे तुम्ही मालक आहात.’

पांड्याने एकूण चार ट्विट केले. यात त्याने लिहिलंय की वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझा आनंद. कृणाल पांड्याच्या क्रिकेट करिअरसाठी देखील त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. यासाठी मोठी हिंमत असावी लागते. आमच्या दोघांच्या करिअरसाठी त्यांनी जो त्याग केला, त्याची परतफेड करणे कठीण आहे. कुंटुंबियांचे स्थान महत्त्वपूर्ण असते, असे ट्विट करत त्याने भावाचेही आभार मानले.आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजांच्या यादीत ६८ व्या स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत त्याने केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. पांड्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 11:42 am

Web Title: indian cricket team all rounder hardik pandya special gift to his father
टॅग : Hardik Pandya
Next Stories
1 बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी
2 जागतिक स्पर्धेला जाण्यापासून रोखले होते!
3 कबड्डीपटू लवकरच कोटय़धीश होईल  -प्रदीप
Just Now!
X