सचिन तेंडुलकर असो अथवा विराट कोहली, भारताचे बहुतांश क्रिकेटपटू हे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात. या जाहिराती क्रिकेटपटूंच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीली सध्याच्या घडीला अनेक उत्पादनांची जाहिरात करतो. मात्र, नुकतीत कोहलीने एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीकडून आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर नाकारल्याचे वृत् आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली म्हणतो, आताच्या मुलांचा ‘तो’ सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे

जी गोष्ट मी स्वतः पीत नाही, त्याची जाहिरात करणं मला योग्य वाटतं नाही. निव्वळ ती जाहिरात करण्यासाठी मला करोडो रुपये मिळतायंत, म्हणून जी गोष्ट मी स्वतः टाळत आलोय त्याची जाहीरात करणं, मला कधीही मान्य नसल्याचं कोहलीने म्हटलंय. कोहली आपल्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरुक आहे. मैदानात फिट राहण्यासाठी दररोज व्यायाम आणि संतुलित आहार या सवयी कोहली आतापर्यंत कटाक्षाने पाळत आलेला आहे.

अवश्य वाचा – विराटचा फिटनेस फंडा जाणून घ्यायचाय, मग हा व्हिडिओ पाहाच

लहानपणी मी देखील सॉफ्ट ड्रिंकसाठी वेडा होतो. मात्र, जेव्हा तुम्ही आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता, तेव्हा फिटनेस लेवलच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंक घेणं योग्य नाही. कोणत्याही क्रीडा अकादमीच्या कँटीनमध्ये खेळाडूंना सॉफ्ट ड्रिंक दिलं जात नाही, असे सांगत कोहलीने ही जाहिरात नाकारण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

अवश्य वाचा – ….तर आणखी १० वर्ष खेळेन – विराट कोहली

याआधीही भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांची जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडू काही प्रमाणात सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिराती करतात. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं कोहलीने म्हटलंय. मात्र, मी जेव्हा कधीही या खेळाडूंना भेटतो, त्यावेळी त्यांना सॉफ्ट ड्रिंक न घेण्याचा सल्ला देत असतो.