30 September 2020

News Flash

भारतीय क्रिकेट संघाकडून श्रीलंकेत स्वातंत्र्यदिन साजरा

या वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले

| August 16, 2017 02:05 am

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेत मंगळवारी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. या वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले. या वेळी भारतीय संघ आणि साहाय्यक मार्गदर्शकही उपस्थितया वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले होते. या वेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतही गायले गेले. या वेळी कोहलीसह भारताच्या सर्व खेळाडूंनी तिरंग्याला मानवंदना दिली. कोहलीने या वेळी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. त्याचबरोबर माझ्या वडिलांचा वाढदिवसही १५ ऑगस्टला असल्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खास आहे, असे कोहली म्हणाला. ‘‘देशवासीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. एक भारतीय असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पण स्वातंत्र्यदिनी देशाभिमानाच्या भावना वेगळ्याच उंचीवर असतात. हा दिवस माझ्यासाठी फारच विशेष असतो, कारण या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस असायचा,’’ असे कोहलीने ट्विटरवर म्हटले आहे.

या वेळी कोहलीने आपल्या लहानपणाच्या आठवणींनाही या वेळी उजाळा दिल्या. तो म्हणाला, ‘‘लहानपणी मी मित्र आणि कुटुंबीयांबरोबर पतंग उडवायचो. त्याचबरोबर सर्वत्र तिंरगा फडकताना पाहिला की आनंद होतो. भारतीय असल्याचा अभिमान तर मला आहेच आणि तो कायम राहील. जय हिंद!’’

आफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या वेळी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘‘भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. चला शांतता, सहिष्णुता आणि प्रेम वाढण्यासाठी एकत्रित काम करू या,’’ असे आफ्रिदीने ट्विटरवर म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 2:05 am

Web Title: indian cricket team celebrate independence day 2017 in sri lanka
Next Stories
1 धोनीबाबतच्या वक्तव्यावरून एमएसके प्रसाद टीकेचे धनी
2 नेदरलँड्सला नमवून भारताचा मालिकाविजय
3 २०२३ मधील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेच्या यजमानपदासाठी केनिया उत्सुक
Just Now!
X