News Flash

जाणून घ्या टीम इंडियाचं २०२१ चं वेळापत्रक…

टीम इंडिया १४ कसोटी, १६ वन-डे आणि २३ टी-२० सामने खेळणार

जगभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे २०२० वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मोठं नुकसान झालं. आजुबाजूची परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने नवीन नियमांसह आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली आहे. २०२० वर्षात टीम इंडियाचे अनेक दौरे करोनामुळे रद्द झाले. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.

२०२० वर्ष करोनामुळे निरस ठरलं असलं तरीही २०२१ वर्षात भारतीय संघाचं वेळापत्रक व्यस्त असणार आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ च्या काळात टीम इंडिया १४ कसोटी, १६ वन-डे आणि २३ टी-२० सामने खेळणार आहे. जाणून घेऊयात टीम इंडियाचं वेळापत्रक –

जानेवारी ते मार्च – इंग्लंडचा भारत दौरा
(४ कसोटी, ४ वन-डे आणि ४ टी-२०)

मार्च ते मे – आयपीएलचा चौदावा हंगाम

जुन – भारताचा श्रीलंका दौरा
(३ वन-डे, ५ टी-२०)

जुन-जुलै – आशिया चषक २०२१

जुलै – भारताचा झिम्बाब्वे दौरा
(३ वन-डे)

जुलै ते सप्टेंबर – भारताचा इंग्लंड दौरा
(५ कसोटी)

ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
(३ वन-डे, ५ टी-२०)

ऑक्टोबर – नोव्हेंबर – टी २० विश्वचषक

नोव्हेंबर – डिसेंबर – न्यूझीलंडचा भारत दौरा
(२ कसोटी, ३ टी-२० सामने)

डिसेंबर – भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
(३ कसोटी, ३ टी-२०)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 4:26 pm

Web Title: indian cricket team schedule virat kohli and team scheduled to play non stop 12 months in 2021 psd 91
Next Stories
1 जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या क्रिकेटपटूने स्वत:च मागितली माफी, कारण…
2 श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे गुण आहेत !
3 पुढील हंगामात लिलाव झाल्यास CSK ने धोनीला सोडून द्यावं – आकाश चोप्रा
Just Now!
X