News Flash

दिनेश कार्तिकने इन्स्टाग्रावर शेअर केला १०० वा फोटो

पण चाहत्यांकडून विचारला जातोय एकच प्रश्न

भारतीय क्रिकेट टीमचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा इन्स्टाग्रामवरील त्याचा १०० वा फोटो होता. कार्तिकने तो फोटो शेअर करताना म्हटले की, ‘१०० वी पोस्ट थोडी खास असावी’ या फोटोमध्ये दिनेश एका निसर्गरम्य ठिकाणी पत्नी दीपिका पल्लीकलसोबत दिसत आहे. या फोटोला अगदी काही तासांमध्ये हजारो लाइक्स मिळाले. या फोटोला कमेंटही खूप आल्या. या कमेंटपैकी अधिकतर कमेंट या जागे संदर्भात होत्या. हा फोटो फान्समध्ये काढला का असाच प्रश्न दिनेशचे चाहते त्याला विचारत होते.

दिनेश कार्तिकने २००७ मध्ये निकिताशी लग्न केले होते. निकीता आणि दिनेश लहानपणापासूनचे मित्र होते. २०१२ च्या आयपीएल ५ पर्यंत दिनेश आणि निकीता एकत्र होते. यादरम्यान निकीताची ओळख मुरली विजयशी झाली आणि ती मुरलीच्या प्रेमात पडली. कार्तिकला जेव्हा मुरली आणि निकिताच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा त्याने तडकाफडकी निकिताला घटस्फोट दिला. यानंतर दिनेशने स्कॉशपटू दीपिकाशी लग्न केले.

३२ वर्षीय दिनेश यंदाच्या आयपीलएमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोलकाता टीमने त्याला ७.४ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. कर्णधार पदाच्या शर्यतीत त्याच्यासोबत रॉबिन उथप्पाचेही नाव होते. पण रॉबिनला संघाटचा उपकर्णधार बनवले गेले. कार्तिकने तामिळनाडू संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने २००९-१० ची हजारे ट्रॉफी जिंकली होती. गेल्यावर्षी दिनेन गुजरात लायन्सकडून खेळला होता. संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने ३६१ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2018 8:20 pm

Web Title: indian cricketer dinesh karthik share 100th post on instagram
Next Stories
1 जिंकण्याच्या झिंगेत बांग्लादेशी खेळाडूने केला ‘नागिन डान्स’
2 ‘हा’ आहे विराट कोहलीच्या मोबाइलचा वॉलपेपर फोटो
3 पृथ्वीच्या कामगिरीने सचिन प्रभावित
Just Now!
X