02 March 2021

News Flash

कृणाल पांड्याची माणुसकी! जेकब मार्टिनना पाठवला ‘ब्लँक चेक’

बडोद्याच्या रुग्णालयात माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे

भारताचे माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. २७ डिसेंबर रोजी मार्टिन यांच्या गाडीला अपघात झाला होता. बडोद्याच्या रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर उपचारासाठी होणारा खर्च पाहता त्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे.

सुरुवातीला मार्टिन यांची पत्नी ख्याती यांनी उपचारासाठी BCCI कडे मदत मागितली होती. नंतर ज्यावेळी हे प्रकरण प्रसारमाध्यमांत आले, तेव्हा इतर आजी माजी क्रिकेटपटूंनी सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम BCCI आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनने आर्थिक मदत केली. त्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान पठाण, युसूफ पठाण, झहीर खान, आशिष नेहरा या क्रिकेटपटूंनीही त्यांना आर्थिक सहकार्य केले.

यात आता मुंबई इंडियन्सचा आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याने मदतीसाठी हात पुढे केला आहे. कृणाल पांड्याने मार्टिन यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून चक्क ब्लँक चेक (रक्कम न टाकलेला धनादेश) दिला आहे. एका वृतानुसार BCCI चे माजी सचिव संजय पटेल यांच्यामार्फत कृणालने हा धनादेश मदत म्हणून पाठवला आहे. ‘त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम त्या चेकवर लिहा, मात्र ती रक्कम लाख रुपयांपेक्षा कमी नसावी’, असे कृणालने सांगितल्याची माहिती संजय पटेल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 4:30 pm

Web Title: indian cricketer krunal pandya helps jacob martin with blank cheque for treatment
Next Stories
1 विराट म्हणतो हार्दिक संघात हवाच, भारतीय कर्णधाराचे अप्रत्यक्ष संकेत
2 श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच – हरभजन
3 महेंद्रसिंह धोनी भारतीय फलंदाजीची मुख्य समस्या – डीन जोन्स
Just Now!
X