X

विराटनंतर आणखी एक भारतीय खेळाडू झाला ‘बाप’

भारतीय क्रिकेटपटूच्या घरी चिमुकल्याचं आगमन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात सोमवारी (११ जानेवारी २०२१) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं होतं. विराट कोहलीनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं. मुश्कात अली चषकात पंजाब संघाचं नेतृत्व करणारा मनदीप सिंह बाप झाला आहे.

२९ वर्षीय मनदीपची पत्नी जगदीप जस्वाल हिनं शनिवारी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मनदीपनं ट्विटरवर याची माहिती दिली आहे. मनदीप-जगदीप जस्वाल यांनी आपल्या मुलाचं नामकरणही केलं आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव राजवीर असं ठेवलं आहे. मनदीप याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मनदीप सिंहनं डिसेंबर २०१६ मध्ये ब्रिटनची प्रेयसी जगदीप जस्वाल हिच्यासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर चार वर्षांनी या दाम्पत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. मनदीपच्या लग्नात माजी कर्णधार एम.एस धोनी आणि हरभजन यांनी हजेरी लावली होती.


मनदीपनं आयपीएलमध्ये पंजाब, कोलकाता आणि आरसीबी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

20
READ IN APP
X